Friday, March 20, 2020


ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आहे का?

परिपूर्ण व्यक्तिमत्व बनण्यासाठी शालेय जीवनात कला, संगीत, खेळ, नाट्य ह्या विषयांचे खूप महत्व आहे. कला म्हटली कि चित्रकला नाट्यकला संगीतकला आणि शरीर सौष्टत्व म्हटले कि, खेळ आणि क्रीडा, मनःस्वास्थ आणि शरीर स्वास्थ दोन्ही सुदृढ असेल तर व्यक्ती सृजनशील बनतो.
पु. ल. देशपांडे म्हणतात साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
संगीत म्हणजे नादब्रह्माची साधना साऊंडचा अभ्यास. गायन, वादन, नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत म्हणतात. आजच्या तणावपूर्ण आयुष्यात मनाला शांती आणि स्फूर्ती देणारी संगीत साधना आवश्यक आहे. विद्यार्थी जेव्हा गातात, वाद्य वाजवतात तेव्हा त्यांच्याकडून नादब्रह्माची साधना होते. संगीतामुळे शरीरातील पंचेंद्रिय सजग होतात आणि स्वरलहरींमुळे एकाग्रता वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते.
संगीत हा विषय आपल्या शाळेमध्ये सक्तीने शिकवला जातो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होतो व विद्यार्थी संगीताकडे भविष्याच्या दृष्टीकोनातून बघू शकतात. गायना बरोबर हार्मोनियम वादन, गीटार वादन, व्हायोलीन वादन, की-बोर्ड, तबला, कोंगो, ड्रम्ससेट अशी अनेक वाद्य आपल्या शाळेत शिकविली जातात. शाळेचा स्वतंत्र वाद्यवृंद आहे. तज्ञ मार्गदर्शक आहेत.
सुगम संगीता बरोबरच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, वेस्टर्न म्युझिक, कथ्थक नृत्याबरोबर, बॉलीवूड डान्स स्टाईल शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांना अ.भा.गा. महाविद्यालयाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. दरवर्षी त्यांना परीक्षेला बसविले जाते. म्हणजे दहावीत पोहोचे पर्यंत त्यांच्या ४ ते ५ परीक्षा पूर्ण होतात. ज्याचे त्यांना स्टेट बोर्ड मध्ये जास्तीचे गुण मिळतात. त्याचबरोबर गांधर्व महाविद्यालयाची डिग्री पूर्ण होण्याकडे त्यांची वाटचाल होते. त्याचा त्यांना पुढील आयुष्यात करीयरच्या दृष्टीने फायदा होतो. असे अनेक फायदे त्याचे आहेत.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


ग्लोबल व्हिजन मध्ये अॅस्ट्रो क्लब म्हणजे खगोल मंडळाची स्थापना करण्याचा काय उद्देश?

       रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा हा चंद्र ना स्वयंभू,
रवितेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा,
अभिशाप भोगतो हा आभास सावली हा,
असतो खरा प्रकाश जे सत्य भासती,
ते असती नितांत भास.
ह्या कवीने अंतराळ, खगोल शास्त्र, पृथ्वी, अवकाश या साऱ्याबद्दलचं सत्य या कवितेत मांडलेय. खगोलशास्त्राचा आभास म्हणजे साऱ्याच विषयाचा एकत्रित (integrated) अभ्यास. विद्यार्थ्याना अंतराळवीर होण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीधर होताना त्याविषयीची माहिती देण म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांना असे विषय शिकवणे, त्या विषयाच्या भविष्यातील संधी विषयी जागरूक करणं हे शिक्षकांच कर्तव्य असत. आम्ही सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अॅस्ट्रो क्लब आठ वर्षापूर्वी सुरु केल आणि अतिशय नियमितपणे तो चालू आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा तो एक महत्वाचा भाग आहे. ज्यामध्ये आपण वर्षभराचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. तो अभ्यासक्रम शिकवताना आपण विद्यार्थ्याकडून अंतराळ विषयीचे विविध प्रकल्प तयार करून घेतो वर्षातून एकदा प्लनेटोरीयम व्हिजीट असते तसेच एकरात्र आकाश निरीक्षण आयोजित केले जाते. यातून विद्यार्थी गणित, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भाषा, भूगोल, इतिहास असे विषय शिकतात अॅस्ट्रोनॉट होण्यासाठी किंवा अॅस्ट्रो फिजीसीस्ट होण्यासाठी प्रोत्साहन मिळते. रिसर्च सायंटिस्ट व्हायचं असेल त्यासाठी नासा, डॉ. होमिभाभा रिसर्च सेंटर, इंडियन इंस्टीट्युट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, इंडियन अॅस्ट्रोबायोलॉजी रिसर्च सेंटर, अशा इंडियन रिसर्च सेंटरची माहिती मिळणे मग त्यांच्या प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने तयारी होते. असे अनेक फायदे अॅस्ट्रो क्लबचे आहेत. हा क्लब सर्वांसाठी खुला आहे. आपल्या अॅस्ट्रो क्लबचे आपल्या शाळेत वर्षातून दहा सेशन्स होतात.
पृथ्वीच्या अवती भवती
ग्रहताऱ्यांचे मनोबल सारे
खगोल शिकणाऱ्यांचे
गोल अवकाशी
अद्भुत निसर्ग किमया

ठेवून आपल्या मनाशी 


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


भाषा विषय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात किती महत्वाचे असतात आणि ते कसे शिकविले जावेत.

भाषा म्हणजे मनाचा आरसा
भाषा उमटवते बुद्धीचा ठसा
भाषा व्यक्त करते भावना
भाषा पोहचवते खऱ्या संवेदना
असं म्हणतात first Impression is the last impression. व्यक्तिचा पहिला प्रभाव हा त्याच्या मुखातून येणाऱ्या भाषेतून पडतो. आपण कोणाचे तरी फॅन का होतो? कारण आपल्याला त्या व्यक्तीच्या दिसण्या बरोबर प्रभावशाली व्यक्त होणं, बोलणं, बोलण्यातून प्रकट होणारे त्यांचे विचार त्याची संवेदनशीलता त्याचा प्रामाणिकपणा, परखडपणा हे सगळं त्याच्या भाषेतून प्रभावित करत असतं. अमिताभ बच्चन यांचे संवादफेक, उच्चार, आवाज, विचार आचरण त्यांना Man of millennium बनवते तर Dr. APJ Abdul kalam यांची संयमित भाषा करोडोंच्या हृदयात त्यांच स्थान निर्माण करते.
यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘भाषा’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा बोली असो लेखी असो दोन्ही माध्यमांवर प्रभुत्व मिळवणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत भाषा विषयांना विशेष महत्व असायला हवे. नर्सरी ते चौथी पर्यंत म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दहाव्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना भाषा शिकण्याचा आनंद घेवू द्यावा.
जर शाळा इंग्रजी माध्यमाची असेल तर इंग्रजी हि प्रथम भाषा असेल मग राष्ट्रभाषा हिंदी राज्यभाषा मराठी आणि आपल्या संकृतीची भाषा संस्कृत या चार भाषा शाळेने प्रामुख्याने शिकविले पाहिजे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या चारही भाषांवर प्रभुत्व आहे. कारण आपण भाषा अगदी अनौपचारिक पद्धतीने शिकवतो आणि शब्द समृद्धी म्हणजे Vocabulary develop व्हायला हवी, मग संवाद करता यायला हवा, मग स्वरचना म्हणजे स्वलेख विचार मांडता यायला हवेत हे केवळ घोकंपट्टी करून होत नाही. त्यासाठी भाषा विषयीचे प्रेम निर्माण करावे लागते. सहभागाच्या संधी निर्माण कराव्या लागतात जसे सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी रोज स्वतःचे विचार मांडणे, स्लोगन लेखन, निबंध लेखन, भाषण कथाकथन, उत्स्फूर्त भाषण, श्लोक पाठांतर, कविता रचना, कथा रचना, शालेय मासिक लिखाण समिती सहभाग, विविध विषयांवर चर्चासत्र आयोजन असे अनेक उपक्रम शाळेत नित्य नियमितपणे आयोजित केले जातात. ज्यामुळे विद्यार्थी व्यक्त व्यायला शिकतात.
संस्कृत उच्च विद्याविभूषित समाजाची भाषा म्हटले जायचे आता आपण संस्कृत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवतो कारण जागतिक स्तरावर संस्कृत भाषेत अनेक प्रयोग होत आहेत. संस्कृत हि टंग ट्वीस्टर आहे. म्हणजे उच्चार शुद्धी, उच्चार स्पष्टता, आणि भाषा शुद्धीसाठी संस्कृत आवश्यक आहे. हायटेक, Computer research टेक्नॉलॉजी मध्ये संस्कृत भाषेचा वापर होतोय. ब्रिटन, जर्मनी, युएसए मध्ये संस्कृत भाषा लहान पणापासून शालेय विषयांमध्ये सहभागी झालीय.

संवादाचे साधन म्हणजे आपली भाषा
मातीचे आपल्याशी नाते म्हणजे भाषा

जिचे बोट पकडून हि सृष्टी बघता येते

ती मायाळू आई म्हणजे आपली भाषा  


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९

ई मेल – manerikarvs@gmail.com 

 समाजाभिमुख शिक्षण का आवश्यक आहे? त्यासाठी जिव्हीआयएस काय उपक्रम राबवते?
आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक होणार असून सामाजिकतेचे भान त्याला असणे हि सध्याच्या काळाची आवश्यकता आहे. समाज म्हणजे कोणत्याही ठरविक वर्ग नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा समजतील घटक आहे आणि त्या समजाचा भविष्यात आपणही एक भाग होणार आहोत हि भावना मुलांच्या मनात जर लहानपणा पासून रुजली तर भविष्यात निर्माण होणाऱ्या सामजिक समस्यांना तो सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो आणि भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी नकळतपणे हि शाळेच्या खांद्यावर आलेली असते. त्यासाठी शाळेने विविध सामजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या जडणघडनीला सामाजिकतेचा स्पर्श दिला पहिजे.
     एका माणसाने दुसऱ्या माणसाचा सन्मान करणे, त्याच्या विषयी सहकार्यची भावना बाळगणे. त्याच्या संस्कृतीचा आदर करणे हा समाजाभिमुख शिक्षणाचा एक भाग आहे. यासाठी आमची ग्लोबल व्हिजन शाळा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना एकमेका सहाय्य करूअवघे धरू सुपंथहि शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतेयाविषयी अधिक सांगायचे झाल्यास संपूर्ण भारतात चलन बदली करण्यात आली होती. या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांची खूप धावपळ झाली अनेक बँकांच्या बाहेर लोकांची चलन बदलासाठी झुंबड उडाली यात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यात आमच्या शाळेतले विद्यार्थी बँकांनमध्ये जाऊन तेथे लोकांना मदत करत होते. ज्यांना बँकेची स्लीप भरता येत नव्हती त्यांना ती भरून देणेजर वृद्ध असतील तर त्यांच्या जागी स्वतः रांगेत उभे राहणे. त्यांना पाणी वाटप करणे यासारखी मदत विद्यार्थ्यांनी केली, त्याच बरोबर उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरवात हि राष्ट्र निर्माण करण्यात ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले अशा थोर महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता करून करण्यात आली जेणेकरून मुलांनमध्ये थोर पुरुषांन विषयी आदर भाव निर्माण व्हावा. विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी इतिहास समजावा. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, नदी स्वच्छता, इट वेल स्टे फिट, मतदान जागृती अभियान यांसारख्या विषयावर पथनाट्य सादर करून समाजातील विविध  स्तरातील नागरिकांशी समोरासमोर संवाद साधला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन शाळा मुलांसाठी करत असते, त्यात डॉक्टर, पोलिस, वकील, शास्त्रज्ञ यांचा समवेश आहेयात मुलांचा आणि मार्गदर्शकांचा परिसंवाद घडवून आणला जातो जेणे करून मुलांना आपले मत व्यक्त करण्याची सवय लागते. यांसारखे अनेक उपक्रम राबून शाळा मुलांना समाजाभिमुख शिक्षण देण्याचा यशस्वी प्रत्यन करत आहे.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

Library is the whole world in mini place...


ग्लोबल व्हिजन ग्रंथालय खूप वैशिष्ट्य पूर्ण आहे, त्याविषयी थोडी माहिती सांगा.

        पुस्तक सांगतात गोष्टी
        वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची
        आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची
        सुखाची, दुखाची, पुस्तके सांगतात गोष्टी.


आपल्याला जर आपला इतिहास जाणून घ्यायचा असेल, आणि स्वतःचा इतिहास घडवायचा असेल तर वाचन हा एकमेव पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्याच्या यांत्रिक युगात वाचन संस्कृती थोडी मागे पडत चालेली आहे. आताची युवा पिढी Whats app, facebook. या सारख्या सोशल मिडीयात खूप गुंतून आहे. हे आपण पाहत आहोत. वाचनाचे फायदे काय असतात हे आपणा सर्वाना माहित आहेच, ते काही वेगळे सांगायची गरज नाही. पण वाईट या गोष्टीचे वाटते कि वाचनाचे फायदे सर्वाना माहित असून सुद्धा वाचकांची संख्या वाढण्या ऐवजी कमी होत आहे. पुस्तक वाचल्याने ज्ञान तर मिळतेच पण त्याचबरोबर एकग्रता, मनन, चिंतन करण्याची सवय लागते. आपण करत असलेली प्रत्येक कृती हि विचार पूर्वक करण्याची आपल्याला सवय लावते. वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि असाच प्रयत्न ग्लोबल व्हिजन लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. शाळेची लायब्ररी म्हंटल म्हणजे ती फक्त विद्यार्थ्यान पुरती मर्यादित असते पण आम्ही चालवत असलेली लायब्ररी हि केवळ विद्यार्थ्यान पर्यंतच मर्यादित न ठेवता पालकांसाठी सुद्धा चालू केले आहे. आमच्या या लायब्ररीत कथा, कादंबरी, ललित साहित्य, काव्य संग्रह या सारखे विविध साहित्य, वाड़मय आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. आगदी पहिली पासून ते दहावी पर्यंत सगळ्यांना ग्रंथाल्याचा तास लावलेला असून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक वाचले पाहिजे यावर विशेष लक्ष दिले जाते. ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. जसे आगदी मुबलक दरात पुस्तके विक्री केली जाते जेणेकरून प्रत्येकाला पुस्तक खरेदी करणे सोपे गेले पाहिजे आणि त्याचबरोबर पुस्तक खरेदी करण्याची सवय लागली पहिजे, त्याचबरोबर प्रत्येक वर्गासाठी वेगळा १ तास लायब्ररी देण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक वर्गाला शालेय पुस्तकांसोबत नॉव्हेल देण्यात येते आणि वर्गावर्गातून त्याचे प्रकट वाचन घेतले जाते यामुळे मुलांना अभिवाचनाची सवय लागते. वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि त्याला काही प्रमाणात यश सुद्धा मिळत आहे. अशा स्वरुपात ग्लोबल व्हिजन लायब्ररी कार्यरत आहे.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


 ग्लोबल व्हिजन शाळेतील बहिर्मुख म्हणजे EXTRA CURRICULAR शिक्षण ज्यात गायन, वादन, नृत्य, नाट्य, कसे शिकवले जातात?

मानवी जीवनाला संस्कार आणि शिस्त लावण्याची महत्वाची भूमिका शाळा बजावत असते. शिक्षणाने मनुष्य केवळ सुशिक्षित होऊ शकतो पण तो संस्कारक्षम होईलच असे नाही. त्याला सामाजिक स्तरावर एक चांगला माणूस म्हणून जर घडवायचे असेल तर त्याला केल्ची जोड हि लागतेच लागते. कलेतून विद्यार्थ्यामध्ये भावनिकता निर्माण होते, कलात्मक दृष्टी कोण वाढीस लागतो, सामाजिकतेचे भान येते. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांत करणारी गोष्ट म्हणजे आपली आवडती कला तिच्या साधनेने मनाला शांती मिळते. सध्या आपण सगळे शांतीच्या शोधात आहोत आणि ती मिळवायची असेल तर कलेची साधना हा एक चांगला पर्याय आहे. या अवांतर कलेच्या ज्ञानामुळे मुलांच्या आकलन क्षमतेचा विकास होतो. त्यांची स्मरण-शक्ती वाढते, निर्णय क्षमता वाढते, एकाग्रता वाढते यासारखे अनेक फायदे होत असतात. म्हणून शालेय अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या विषयांमुळे मुले शाळेत रमतात, त्यांना शाळाविषयी गोडी निर्माण होते. त्यांच्या आभ्यासातील संकल्पना समजून घेण्यास मदत होते. विचार करण्याची क्षमता निर्माण होते.
    आमच्या गोबल व्हिजन स्कुल मध्ये EXTRA CURICULAR शिक्षणाकडे आम्ही विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षण मंडळ नियमा नुसार शाळेच्या मुलांचे वेळापत्रक तयार केले जाते आणि त्यानुसार त्यांचा आभ्यासही घेतला जातो पण आम्ही यात थोडे स्वातंत्र्य घेवून रोज शालेय वेळापत्रका व्यतिरिक्त जास्तचा १ तास आम्ही मुलांचा घेत असतो त्यात आम्ही मुलांना गायन, वादन, खेळ, नृत्य, नाट्य हे विषय शिकवत असतो यात शाळेचा प्रत्येक विद्यार्थी सहभागी होत असून त्याला आपल्या आवडत्या कलेबरोबर इतर कलांचेही ज्ञान मिळत असते. शाळेने  EXTRA CURICULAR शिक्षणासाठी त्याविषयात पारंगत शिक्षकांची नेमणूक केली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने या कलांचे ज्ञान मिळते. या EXTRA CURICULAR मध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी यश संपादन करून स्वतःचे नाव झळकावले आहे. स्वताला व्यक्त करण्याची कला जर मुलांमध्ये रुजली, कि ते कुठेहि आपले अस्तित्व निर्माण करू शकतात. यासाठी हे विषय महत्वाचे आहे. एक आदर्श माणूस घडविण्यासाठी कलेचे शिक्षण हे मुलाना दिले पाहिजे. सध्याची वाढत चालेली अराजकता थांबवायची असेल तर रसिकता निर्माण झाली पाहिजे आणि ते कलेच्या शिक्षणातून सध्या होत असते.   



सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


ग्लोबल व्हिजन शाळेतील ब्रेनव्हेव संकल्पनेची विस्तृत माहिती.

ग्लोबल व्हिजन शाळेची ब्रेनव्हेव हि अनोखी संकल्पना आहे. ब्रेनव्हेव म्हणजे बौद्धिक लाट. विविध विषयांचे गुणदर्शन, आकलन आणि मूल्यमापन या प्रयोगातून केले जाते. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा हि बोर्डाने किंवा शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या पद्धतीने घेणे बंधनकारक असते. आपल्याच शिक्षकांनी आपल्याच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन लेखी किंवा तोंडी परीक्षेत एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने करण्याची सक्ती सगळ्याच शाळांना असते. पण ते करून आणि त्या पेक्षा आणखीन थोडे पुढे जाऊन व थोडे स्वातंत्र्य घेऊन, ग्लोबल व्हिजन शाळेत ब्रेनव्हेव पद्धतीने मुलांचे परीक्षण, निरीक्षण केले जाते परंतु ते केवळ शाळेतील शिक्षकांकडून नव्हे, तर समाजीतील विवध क्षेत्रात यशस्वी, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, सुप्रसिद्ध अशा उद्योजक, आर्किटेक, लेखक, कलाकर, समाजसेवक, उच्च पदाधिकारी अशा दिग्गज व्यक्तिमत्व कडून होते. पाटी पुस्तक खडू फळा याही पेक्षा खूप काही देते माझी शाळा. या सदरात मोडणारा हा उपक्रम आहेया उपक्रमातून आम्ही शिकवलेल्या विषयातून मुलांच्या क्षमतांचा विकास झाला आहे  का? मुले स्वतंत्रपने या उपक्रमात सह्भागी होऊन आपले विचार मुक्तपणे मांडू शकतात का? ब्रेनव्हेव ची संकल्पना अशी आहे कि आभ्यासक्रमावर आधारित धडे, कविता, वैज्ञानिक संकल्पना ऐतिहासिक घटना, गणितीक कोडी, कथा-कथन, भाषण, कविता, रसग्रहण, ललित लेखन, कथा लेखन. निषेध लेखन अशा सर्व विषयातून विद्यार्थ्यांच्या या क्षमतांचा विकास झाला आहे का? आपण जे शिक्षण देतोय विद्यार्थी ते खरोखर आत्मसात करत आहे का? ते शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे रुजतेय हे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ओपन चॅलेंज देऊन खुल्या स्पर्धेच्या स्वरूपात स्वतः व्यक्त करण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना ब्रेनव्हेवच्या माध्यमातून दिली जाते. तीन स्तरावर हि स्पर्धा चालते आणि शंभर टक्के विद्यर्थ्यांचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य होय. या उपक्रमातून कोणता विद्यार्थी कोणत्या विषयात जास्त तरबेज आहे हे लक्षात येते, कुणी उत्कृष्ट भाषणकार म्हणजे वक्ता तर, कुणी कवी तर कुणी गणितात प्रविण असते, तर कुणी समाजशास्त्रात. हे या उपक्रमातून स्पष्ट होते आणि यात सर्वच विद्यार्थी सर्वच विषय आनंदी मूड आणि उत्साहाने शिकतात हा एक अॅडीश्नल फायदा होतो.

गुण आणि बुद्धिमत्तेचा करू आम्ही विकास
स्पर्धेतून ओळखू खऱ्या जीवनाचा प्रवास.
विविध आमचे उपक्रम जसे ब्रेनव्हेव, मार्केट डे,
आनंदी शाळेतील आनंदी क्षणाने enjoy करू इच डे.




सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


प्रयोगशील शिक्षण म्हणजे काय? त्याचा मुलांवर सकरात्मक परिणाम कसा होतो

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शिक्षण म्हणजे काय केवळ पुस्तके वाचली आणि परीक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास, त्यांच्या क्षमता, बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती, दृष्टीकोन, जीवन विषयक मुल्ये, शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे.
प्रयोगशील शिक्षण म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम करून, प्रयोग करूनप्रोजेक्ट करूनत्यातून अनुभव घेणे आणि मग त्या संकल्पनांची खरी उकल होणे यास आपण प्रयोगशीलता म्हणू शकतो. उदा. साखर पाण्यात विरघळते हे प्रत्यक्ष करून पहिले कि लगेच भौतिक बदलरासायनिक बदल समजतात त्याच बराबर भाषा विषय असेल तर विद्यार्थ्यांना भाषणात सहबह्गी करून घेऊन सर्वांसमक्ष स्वतःची मते व्यक्त करायला लावणे. समाजशास्त्र शिकवताना प्रत्यक्ष मंत्री मंडळ स्थापन करणे. गणित असेल तर अनेक प्रयोग करणे जसे घड्याळ, वेळ धडा शिकवताना प्रत्यक्ष घड्याळ तयार करून त्याचे काटे पुढे मागे करून वेळेचे गणित समजून घेणे, भौमितिक गणित आणि बीजगणिताची सांगड घालताना मुलांना एखादा रूम रंगवण्याचा प्रोजेक्ट देणे. ज्यात विद्यार्थी रंगाची किंमतभिंतीच्या आकाराचे मोजमाप, रंगाचे प्रमाण म्हणजे त्याला किती रंग लागणारत्याला रंगवायला लागणार वेळ किती लागणार, मजुरी किती होणार अशा एका पेक्षा अनेक व्यवहारीक गोष्टी प्रयोगातून शिकतात. मग आपले गणित पक्के आहे का? आपल्याला व्यावहारिक गणित येते का? आकारमान मोजमाप, अंकगणित या संकल्पना समजल्या का याची उकल होते. प्रत्यक विषय अनुभवातून शिकवावा म्हणजे ती संकल्पना कायमस्वरूपी लक्षात राहते आणि घोकंपट्टीची फारशी गरज राहत नाही. शारीरिक हालचाली होतात. टीम मध्ये काम करण्यासाठी लागणारी सहिष्णुता वाढतेअसे अनेक फायदे या शिक्षण पद्धतीचे होतातअसे अनेक प्रयोग आपण ग्लोबल व्हिजन स्कूल मध्ये करतो आणि शिक्षण आनंददायी करतो.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...