Friday, March 20, 2020


ग्लोबल व्हिजन प्रीस्कूलच्या अनोख्या उपक्रमांविषयी...

-    प्रीस्कूलमध्ये अडीच ते पाच वयोगटाची मुले असतात. शिक्षण हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. अगदी तान्हे बाळही शिकत असतेआवाजाच्या दिशेला मान वळवणे इथपासून रांगणेबसने, चालणे, बोलणे हे सारे मुलं आपले आपणच शिकत असते. आपले कुटुंब, परिवार, भाषा शिकते. जगण्यासाठी आनंदासाठी कौशल्य शिकते त्याच्या धडपडीला संधी देणे आपले कर्तव्य आहे. शिकण्याच्या सहज प्रवृत्तीतुन शिक्षण सुरु असतेयाचाच बालशिक्षणात उपयोग करायचा असतो. ‘खेळ हि मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळत मुले आनंदी असतात आणि एकाग्रचित्त होतात. खेळ या नैसर्गिक प्रवृत्तीतुन मुले स्नायूंवर ताबा मिळवतात. कौशल्य (Skills) शिकतात. problem solving, friendship, cooperation, unity, togetherness अशा concepts शिकतात bhataukli, dolls house, pairing, puzzles अशा खेळांनी मानसिक म्हणजे psychological development होते. Smartness, decision making वाढते आपल्याकडे child activity centre आहे. जिथे मुले kids gym करतात, वाळूत खेळतात, गार्डन एरिया आहे. जिथे मुले बागकाम करतात, रंगकाम करतात, मुलांसाठी खास वर्गातील भिंतीचा भाग black board सारखा बनवलाय, ज्यावर मुले खडूने मनमुराद रेघोट्या मारतात, विविध शेप्स काढतात म्हणजे त्यांच्या बोटांना ग्रीप येते. फाईन मोटार स्कील डेव्हलप होतातखेळामधुनी प्रयोगातुनी मुल खरोखर शिकते हे शिकणे आयुष्य घडवते पुढे चिरंतन टिकते. प्रत्येक मुल वेगळे असते. उंची, रंग, ठेवण केसांचा पोत या प्रत्येक बाबतीत मुले वेगवेगळी असतात. त्याच प्रमाणे स्वभाव, समाज, कौशल्य  बुद्धी या बाबतीतही प्रत्येक मुलाची शिकण्याची गती, आवडीचे क्षेत्र, अवधान क्षेत्र वेगवेगळी असतात. मुलांचे हे वेगळेपण लक्षात घेवून त्याच्या शिकण्याचा विचार करायला हवं. खेळामधुनी मौजे मधुनी ज्ञान मिळवता येते तेच मुलांना खडतर जीवन जगणेही शिकवते.



सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment