Friday, March 20, 2020


प्रयोगशील शिक्षण म्हणजे काय? त्याचा मुलांवर सकरात्मक परिणाम कसा होतो

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शिक्षण म्हणजे काय केवळ पुस्तके वाचली आणि परीक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास, त्यांच्या क्षमता, बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती, दृष्टीकोन, जीवन विषयक मुल्ये, शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे.
प्रयोगशील शिक्षण म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम करून, प्रयोग करूनप्रोजेक्ट करूनत्यातून अनुभव घेणे आणि मग त्या संकल्पनांची खरी उकल होणे यास आपण प्रयोगशीलता म्हणू शकतो. उदा. साखर पाण्यात विरघळते हे प्रत्यक्ष करून पहिले कि लगेच भौतिक बदलरासायनिक बदल समजतात त्याच बराबर भाषा विषय असेल तर विद्यार्थ्यांना भाषणात सहबह्गी करून घेऊन सर्वांसमक्ष स्वतःची मते व्यक्त करायला लावणे. समाजशास्त्र शिकवताना प्रत्यक्ष मंत्री मंडळ स्थापन करणे. गणित असेल तर अनेक प्रयोग करणे जसे घड्याळ, वेळ धडा शिकवताना प्रत्यक्ष घड्याळ तयार करून त्याचे काटे पुढे मागे करून वेळेचे गणित समजून घेणे, भौमितिक गणित आणि बीजगणिताची सांगड घालताना मुलांना एखादा रूम रंगवण्याचा प्रोजेक्ट देणे. ज्यात विद्यार्थी रंगाची किंमतभिंतीच्या आकाराचे मोजमाप, रंगाचे प्रमाण म्हणजे त्याला किती रंग लागणारत्याला रंगवायला लागणार वेळ किती लागणार, मजुरी किती होणार अशा एका पेक्षा अनेक व्यवहारीक गोष्टी प्रयोगातून शिकतात. मग आपले गणित पक्के आहे का? आपल्याला व्यावहारिक गणित येते का? आकारमान मोजमाप, अंकगणित या संकल्पना समजल्या का याची उकल होते. प्रत्यक विषय अनुभवातून शिकवावा म्हणजे ती संकल्पना कायमस्वरूपी लक्षात राहते आणि घोकंपट्टीची फारशी गरज राहत नाही. शारीरिक हालचाली होतात. टीम मध्ये काम करण्यासाठी लागणारी सहिष्णुता वाढतेअसे अनेक फायदे या शिक्षण पद्धतीचे होतातअसे अनेक प्रयोग आपण ग्लोबल व्हिजन स्कूल मध्ये करतो आणि शिक्षण आनंददायी करतो.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment