Thursday, March 19, 2020


जीव्हीआयएस तर्फे कोणते शिक्षण देण्यात येते?

पुस्तक पाटी खडू फळा याही पेक्षा खूप काही देते माझी शाळा असे ध्येय ठेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांसाठी अंबड येथे शाळा सुरु करून हातचे काहीही न ठेवता. अगदी सढळ हाताने प्रांजळ अंतःकरणाने सर्वच स्तरावरील विद्यार्थ्यांना भरभरून ज्ञानाची द्वारे खुली करून देण्याचे कार्य आम्ही सुरु केले. अंबड सारख्या नाशिक जवळच्या छोट्या गावात माझी शाळा असे घडविते जीवन ज्ञाना बरोबर देते संस्काराची शिकवण अशा तत्वाने सुरु केलेली शाळा म्हणजे ग्लोबल व्हिजन. थोड्याच कालावधीत इथे चालणाऱ्या अनेक प्रयोगशील उपक्रमांमुळे लवकरच नाशिककरांच्या हृदयात आमची शा घर करू लागली आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांना आनंद निर्मितीतून ज्ञानसंपन्न करता येते यासाठी नवनवीन आणि अनोखे प्रयोग शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एक आश्वासक आधार मिळतो. अशी हि शाळा आहे त्यात अनेक प्रयोगशील उपक्रम आहेत. आमची शाळा म्हणजे अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग आहे ज्यामध्ये अॅस्ट्रो क्लब, संस्कृत क्लब, नृत्य, नाट्य, संगीत, स्पोर्ट्स क्लब, यासारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी दिल्या जातात. पालकांसाठी अॅक्टीव मदर्स क्लब आहे, संस्कृत क्लब आहे ज्यातून मुलं वेगवेगळे उपक्रमातून शिक्षण घेतात त्यामुळे ते शिक्षण अनुभवी आणि प्रयोगशील ठरतं त्यामुळे शाळा त्यांना जास्त आवडते तसेच ज्या शिक्षणातील संकल्पना जास्त दृढपणे शिकल्या जातात.  

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment