शिक्षणातील
विविध स्तर स्पष्ट करा.
आयुष्य
जर चांगले जगयाचे असेल तर संस्कार आणि शिक्षणाला पर्याय नाही. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, आपल्यातली क्षमता ओळखून त्याचा विकास
करता आला पाहिजे आणि समाजहित याची जाणीव असायला पाहिजे.
शालेय
शिक्षण पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि मग विद्यापीठ व
मुक्त विद्यापीठ अशा विविध पायऱ्या निर्माण झाल्या. शिक्षण हे मानवी जीवन सुखी, समृद्ध व प्रगत करण्याचे म्हत्वाचे
माध्यम आहे. माणसाकडे बुद्धी, स्मरणशक्ती, विचारशक्ती, आणि संवादशक्ती आहे म्हणून विकास
आहे. प्राचीन
काळापासून भारत हा सुसंस्कृत आणि प्रगत देश मनाला जातो. चौदा विद्या आणि चौसष्ट कला
आपल्याकडे आहेत. ज्ञानार्जन, चारित्र्य संवर्धन, संस्कृती रक्षण, व्यक्तिगत आणि समाज विकास हि
शिक्षणाची मुख्य उद्दिष्ट्ये, मानवतावादी, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आधुनिक विकासाचे शिक्षण हि काळाची गरज आहे.
स्वामी
विवेकानंदानी जगाला पटवून दिल होतं जगातील सर्व ज्ञानाचा उगम मानवी मनात आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे आत्मानुभूती
आणि आत्मसाक्षात्कार!
भारतीय
अभ्यासक्रमानुसार ह्याची सुरवात हि गर्भसंस्कारापासून होते. जन्मापासून मग प्रेम, लळा, निरीक्षण यातून बालक शिकायला लागतो
त्यात पालकांसाठी त्यात पालकांनी अतिशय डोळस पाने वागलं पाहिजे. तीन ते पाच-साडेपाच वयोगटात शिक्षण सुरु होते. आमच्या शाळेत पूर्वप्राथमिक विभाग
ज्याला आम्ही ग्लोबल किड्स प्रिस्कूल असे म्हणतो तो स्वतंत्र आहे आणि त्यामध्ये
सर्वोत्तम संस्कार रुजावण्यावर भर असतो. ज्यामध्ये उत्तम भाषा संस्कार, परिसराची ओळख, संवाद ससंस्कार, अभिव्यक्ती संस्कार, अक्षर-अंक ओळख हे विवध उपक्रमांच्या
माध्यमातून तसेच अभिनय, संगीत, गाणे ज्यात बडबडगीते, खेळ हे सगळे नाटिकेच्या माध्यमातून
यातून दिले जाते.
ज्ञान मुलांना देता देता
संस्कारांची हवीच सोबत
तेव्हा शिक्षण आपले बनते
जीवनातील अमुल्य दौलत.
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment