Friday, March 20, 2020


 समाजाभिमुख शिक्षण का आवश्यक आहे? त्यासाठी जिव्हीआयएस काय उपक्रम राबवते?
आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक होणार असून सामाजिकतेचे भान त्याला असणे हि सध्याच्या काळाची आवश्यकता आहे. समाज म्हणजे कोणत्याही ठरविक वर्ग नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा समजतील घटक आहे आणि त्या समजाचा भविष्यात आपणही एक भाग होणार आहोत हि भावना मुलांच्या मनात जर लहानपणा पासून रुजली तर भविष्यात निर्माण होणाऱ्या सामजिक समस्यांना तो सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो आणि भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी नकळतपणे हि शाळेच्या खांद्यावर आलेली असते. त्यासाठी शाळेने विविध सामजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या जडणघडनीला सामाजिकतेचा स्पर्श दिला पहिजे.
     एका माणसाने दुसऱ्या माणसाचा सन्मान करणे, त्याच्या विषयी सहकार्यची भावना बाळगणे. त्याच्या संस्कृतीचा आदर करणे हा समाजाभिमुख शिक्षणाचा एक भाग आहे. यासाठी आमची ग्लोबल व्हिजन शाळा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना एकमेका सहाय्य करूअवघे धरू सुपंथहि शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतेयाविषयी अधिक सांगायचे झाल्यास संपूर्ण भारतात चलन बदली करण्यात आली होती. या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांची खूप धावपळ झाली अनेक बँकांच्या बाहेर लोकांची चलन बदलासाठी झुंबड उडाली यात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यात आमच्या शाळेतले विद्यार्थी बँकांनमध्ये जाऊन तेथे लोकांना मदत करत होते. ज्यांना बँकेची स्लीप भरता येत नव्हती त्यांना ती भरून देणेजर वृद्ध असतील तर त्यांच्या जागी स्वतः रांगेत उभे राहणे. त्यांना पाणी वाटप करणे यासारखी मदत विद्यार्थ्यांनी केली, त्याच बरोबर उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरवात हि राष्ट्र निर्माण करण्यात ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले अशा थोर महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता करून करण्यात आली जेणेकरून मुलांनमध्ये थोर पुरुषांन विषयी आदर भाव निर्माण व्हावा. विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी इतिहास समजावा. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, नदी स्वच्छता, इट वेल स्टे फिट, मतदान जागृती अभियान यांसारख्या विषयावर पथनाट्य सादर करून समाजातील विविध  स्तरातील नागरिकांशी समोरासमोर संवाद साधला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन शाळा मुलांसाठी करत असते, त्यात डॉक्टर, पोलिस, वकील, शास्त्रज्ञ यांचा समवेश आहेयात मुलांचा आणि मार्गदर्शकांचा परिसंवाद घडवून आणला जातो जेणे करून मुलांना आपले मत व्यक्त करण्याची सवय लागते. यांसारखे अनेक उपक्रम राबून शाळा मुलांना समाजाभिमुख शिक्षण देण्याचा यशस्वी प्रत्यन करत आहे.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...