Friday, March 20, 2020

Library is the whole world in mini place...


ग्लोबल व्हिजन ग्रंथालय खूप वैशिष्ट्य पूर्ण आहे, त्याविषयी थोडी माहिती सांगा.

        पुस्तक सांगतात गोष्टी
        वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची
        आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची
        सुखाची, दुखाची, पुस्तके सांगतात गोष्टी.


आपल्याला जर आपला इतिहास जाणून घ्यायचा असेल, आणि स्वतःचा इतिहास घडवायचा असेल तर वाचन हा एकमेव पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्याच्या यांत्रिक युगात वाचन संस्कृती थोडी मागे पडत चालेली आहे. आताची युवा पिढी Whats app, facebook. या सारख्या सोशल मिडीयात खूप गुंतून आहे. हे आपण पाहत आहोत. वाचनाचे फायदे काय असतात हे आपणा सर्वाना माहित आहेच, ते काही वेगळे सांगायची गरज नाही. पण वाईट या गोष्टीचे वाटते कि वाचनाचे फायदे सर्वाना माहित असून सुद्धा वाचकांची संख्या वाढण्या ऐवजी कमी होत आहे. पुस्तक वाचल्याने ज्ञान तर मिळतेच पण त्याचबरोबर एकग्रता, मनन, चिंतन करण्याची सवय लागते. आपण करत असलेली प्रत्येक कृती हि विचार पूर्वक करण्याची आपल्याला सवय लावते. वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि असाच प्रयत्न ग्लोबल व्हिजन लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. शाळेची लायब्ररी म्हंटल म्हणजे ती फक्त विद्यार्थ्यान पुरती मर्यादित असते पण आम्ही चालवत असलेली लायब्ररी हि केवळ विद्यार्थ्यान पर्यंतच मर्यादित न ठेवता पालकांसाठी सुद्धा चालू केले आहे. आमच्या या लायब्ररीत कथा, कादंबरी, ललित साहित्य, काव्य संग्रह या सारखे विविध साहित्य, वाड़मय आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. आगदी पहिली पासून ते दहावी पर्यंत सगळ्यांना ग्रंथाल्याचा तास लावलेला असून प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक वाचले पाहिजे यावर विशेष लक्ष दिले जाते. ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. जसे आगदी मुबलक दरात पुस्तके विक्री केली जाते जेणेकरून प्रत्येकाला पुस्तक खरेदी करणे सोपे गेले पाहिजे आणि त्याचबरोबर पुस्तक खरेदी करण्याची सवय लागली पहिजे, त्याचबरोबर प्रत्येक वर्गासाठी वेगळा १ तास लायब्ररी देण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक वर्गाला शालेय पुस्तकांसोबत नॉव्हेल देण्यात येते आणि वर्गावर्गातून त्याचे प्रकट वाचन घेतले जाते यामुळे मुलांना अभिवाचनाची सवय लागते. वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि त्याला काही प्रमाणात यश सुद्धा मिळत आहे. अशा स्वरुपात ग्लोबल व्हिजन लायब्ररी कार्यरत आहे.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...