Friday, March 20, 2020


ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आहे का?

परिपूर्ण व्यक्तिमत्व बनण्यासाठी शालेय जीवनात कला, संगीत, खेळ, नाट्य ह्या विषयांचे खूप महत्व आहे. कला म्हटली कि चित्रकला नाट्यकला संगीतकला आणि शरीर सौष्टत्व म्हटले कि, खेळ आणि क्रीडा, मनःस्वास्थ आणि शरीर स्वास्थ दोन्ही सुदृढ असेल तर व्यक्ती सृजनशील बनतो.
पु. ल. देशपांडे म्हणतात साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
संगीत म्हणजे नादब्रह्माची साधना साऊंडचा अभ्यास. गायन, वादन, नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत म्हणतात. आजच्या तणावपूर्ण आयुष्यात मनाला शांती आणि स्फूर्ती देणारी संगीत साधना आवश्यक आहे. विद्यार्थी जेव्हा गातात, वाद्य वाजवतात तेव्हा त्यांच्याकडून नादब्रह्माची साधना होते. संगीतामुळे शरीरातील पंचेंद्रिय सजग होतात आणि स्वरलहरींमुळे एकाग्रता वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते.
संगीत हा विषय आपल्या शाळेमध्ये सक्तीने शिकवला जातो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होतो व विद्यार्थी संगीताकडे भविष्याच्या दृष्टीकोनातून बघू शकतात. गायना बरोबर हार्मोनियम वादन, गीटार वादन, व्हायोलीन वादन, की-बोर्ड, तबला, कोंगो, ड्रम्ससेट अशी अनेक वाद्य आपल्या शाळेत शिकविली जातात. शाळेचा स्वतंत्र वाद्यवृंद आहे. तज्ञ मार्गदर्शक आहेत.
सुगम संगीता बरोबरच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, वेस्टर्न म्युझिक, कथ्थक नृत्याबरोबर, बॉलीवूड डान्स स्टाईल शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांना अ.भा.गा. महाविद्यालयाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. दरवर्षी त्यांना परीक्षेला बसविले जाते. म्हणजे दहावीत पोहोचे पर्यंत त्यांच्या ४ ते ५ परीक्षा पूर्ण होतात. ज्याचे त्यांना स्टेट बोर्ड मध्ये जास्तीचे गुण मिळतात. त्याचबरोबर गांधर्व महाविद्यालयाची डिग्री पूर्ण होण्याकडे त्यांची वाटचाल होते. त्याचा त्यांना पुढील आयुष्यात करीयरच्या दृष्टीने फायदा होतो. असे अनेक फायदे त्याचे आहेत.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...