ग्लोबल किड्स प्रीस्कूलमध्ये छोटे बालचमू कसे घडविले
जातात.
-
ग्लोबल किड्स प्रीस्कूल म्हणजे आमच्या शाळेचा
पूर्व प्राथमिक विभाग, ज्यात प्ले ग्रुप ते सिनियर केजी चे वर्ग आहेत. त्याच बरोबर दोन ते पाच वयोगटासाठी
अॅक्टीव्हिटी सेंटर आहे. नोकरी करणाऱ्या महिलांची तारांबळ होवू नये म्हणून डे
केयर सेंटर हि आहे.
दोन ते
पाच वयोगटातील मुलांना आई शिवाय राहायचे म्हणजे सर्वप्रथम प्रेमाची गरज असते. मातृ-हृदय असणाऱ्या शिक्षिका, आया असल्यामुळे या छोट्या
बालचमुंचे चेहेरे नेहेमी प्रसन्न आणि आनंदी असतात. आपली शाळा म्हणजे सुखी व कौटुंबिक
शाळा आहे. जिथे गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ आणि लहान लहान उद्योगात मुले मशगुल होतात आणि मग
शाळेच्या वातावरणात एकरूप होऊन जातात. त्यातूनच आनंदिमय वातावरण निर्माण होते. मग छोटी मुले SHARING, CARING, EXPRESSION, LANGUAGE, PRONUNCIATION, FRENDSHIP, COMMUNICATION
कॉन्सेप्टस शिकतात, मुलांमध्ये असलेल्या निर्मिती
क्षमतेला वाव देण्यासाठी काही गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. वस्तुरूप अशी विविध मुलभूत
आकारांची साधने किंवा GIFTS LIKE BOLLS,
MECHANO, TRICYCLES, WOODEN TOYS, FLAPH
CARDS इत्यादी हेतुपूर्ण व्यवस्थित आखणी
केलेले योजनाबद्ध खेळ आणि कार्यमग्नता म्हणजे त्यांना एखादी खेळणी द्या आणि
त्यांचे CONCENTRATION एकाग्रचीत्तेचे निरीक्षण करा.
अशा
पद्धतीने आपल्याकडे अगदी छोट्या मुलांना शाळेची गोडी लावली जाते म्हणजे मग त्यांना
रोज शाळेत यावेसे वाटते. त्यांच्या तीन तासाच्या शाळेत अगदी सकाळच्या
प्रार्थनेपासून शाळा सुटण्याच्या वेळेच्या वंदेमातरम पर्यंत शिस्तबद्ध पण खेळी
मेळीच्या वातावरणात अनेक गोष्टी मुले शिकतात. मग त्यात सुरुवात हि विविध
भाषांमधील प्रार्थना, संस्कृत श्लोक, बोधकथा, कवायत (व्यायाम) प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, सुविचार, चांगल्या सवयींची उजळणी (GOODHABITS) अशा परिपाठने (अॅसेम्बलीने) होते. जिथे मुलांचा २० मिनिटे उभे राहण्याचा स्टॅमीना
बिल्टअप होतो.
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment