Friday, March 20, 2020


ग्लोबल व्हिजन मध्ये अॅस्ट्रो क्लब म्हणजे खगोल मंडळाची स्थापना करण्याचा काय उद्देश?

       रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा हा चंद्र ना स्वयंभू,
रवितेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा,
अभिशाप भोगतो हा आभास सावली हा,
असतो खरा प्रकाश जे सत्य भासती,
ते असती नितांत भास.
ह्या कवीने अंतराळ, खगोल शास्त्र, पृथ्वी, अवकाश या साऱ्याबद्दलचं सत्य या कवितेत मांडलेय. खगोलशास्त्राचा आभास म्हणजे साऱ्याच विषयाचा एकत्रित (integrated) अभ्यास. विद्यार्थ्याना अंतराळवीर होण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीधर होताना त्याविषयीची माहिती देण म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणे आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांना असे विषय शिकवणे, त्या विषयाच्या भविष्यातील संधी विषयी जागरूक करणं हे शिक्षकांच कर्तव्य असत. आम्ही सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अॅस्ट्रो क्लब आठ वर्षापूर्वी सुरु केल आणि अतिशय नियमितपणे तो चालू आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा तो एक महत्वाचा भाग आहे. ज्यामध्ये आपण वर्षभराचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. तो अभ्यासक्रम शिकवताना आपण विद्यार्थ्याकडून अंतराळ विषयीचे विविध प्रकल्प तयार करून घेतो वर्षातून एकदा प्लनेटोरीयम व्हिजीट असते तसेच एकरात्र आकाश निरीक्षण आयोजित केले जाते. यातून विद्यार्थी गणित, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भाषा, भूगोल, इतिहास असे विषय शिकतात अॅस्ट्रोनॉट होण्यासाठी किंवा अॅस्ट्रो फिजीसीस्ट होण्यासाठी प्रोत्साहन मिळते. रिसर्च सायंटिस्ट व्हायचं असेल त्यासाठी नासा, डॉ. होमिभाभा रिसर्च सेंटर, इंडियन इंस्टीट्युट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, इंडियन अॅस्ट्रोबायोलॉजी रिसर्च सेंटर, अशा इंडियन रिसर्च सेंटरची माहिती मिळणे मग त्यांच्या प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने तयारी होते. असे अनेक फायदे अॅस्ट्रो क्लबचे आहेत. हा क्लब सर्वांसाठी खुला आहे. आपल्या अॅस्ट्रो क्लबचे आपल्या शाळेत वर्षातून दहा सेशन्स होतात.
पृथ्वीच्या अवती भवती
ग्रहताऱ्यांचे मनोबल सारे
खगोल शिकणाऱ्यांचे
गोल अवकाशी
अद्भुत निसर्ग किमया

ठेवून आपल्या मनाशी 


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment