Friday, March 20, 2020


भाषा विषय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात किती महत्वाचे असतात आणि ते कसे शिकविले जावेत.

भाषा म्हणजे मनाचा आरसा
भाषा उमटवते बुद्धीचा ठसा
भाषा व्यक्त करते भावना
भाषा पोहचवते खऱ्या संवेदना
असं म्हणतात first Impression is the last impression. व्यक्तिचा पहिला प्रभाव हा त्याच्या मुखातून येणाऱ्या भाषेतून पडतो. आपण कोणाचे तरी फॅन का होतो? कारण आपल्याला त्या व्यक्तीच्या दिसण्या बरोबर प्रभावशाली व्यक्त होणं, बोलणं, बोलण्यातून प्रकट होणारे त्यांचे विचार त्याची संवेदनशीलता त्याचा प्रामाणिकपणा, परखडपणा हे सगळं त्याच्या भाषेतून प्रभावित करत असतं. अमिताभ बच्चन यांचे संवादफेक, उच्चार, आवाज, विचार आचरण त्यांना Man of millennium बनवते तर Dr. APJ Abdul kalam यांची संयमित भाषा करोडोंच्या हृदयात त्यांच स्थान निर्माण करते.
यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘भाषा’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा बोली असो लेखी असो दोन्ही माध्यमांवर प्रभुत्व मिळवणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत भाषा विषयांना विशेष महत्व असायला हवे. नर्सरी ते चौथी पर्यंत म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दहाव्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना भाषा शिकण्याचा आनंद घेवू द्यावा.
जर शाळा इंग्रजी माध्यमाची असेल तर इंग्रजी हि प्रथम भाषा असेल मग राष्ट्रभाषा हिंदी राज्यभाषा मराठी आणि आपल्या संकृतीची भाषा संस्कृत या चार भाषा शाळेने प्रामुख्याने शिकविले पाहिजे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या चारही भाषांवर प्रभुत्व आहे. कारण आपण भाषा अगदी अनौपचारिक पद्धतीने शिकवतो आणि शब्द समृद्धी म्हणजे Vocabulary develop व्हायला हवी, मग संवाद करता यायला हवा, मग स्वरचना म्हणजे स्वलेख विचार मांडता यायला हवेत हे केवळ घोकंपट्टी करून होत नाही. त्यासाठी भाषा विषयीचे प्रेम निर्माण करावे लागते. सहभागाच्या संधी निर्माण कराव्या लागतात जसे सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी रोज स्वतःचे विचार मांडणे, स्लोगन लेखन, निबंध लेखन, भाषण कथाकथन, उत्स्फूर्त भाषण, श्लोक पाठांतर, कविता रचना, कथा रचना, शालेय मासिक लिखाण समिती सहभाग, विविध विषयांवर चर्चासत्र आयोजन असे अनेक उपक्रम शाळेत नित्य नियमितपणे आयोजित केले जातात. ज्यामुळे विद्यार्थी व्यक्त व्यायला शिकतात.
संस्कृत उच्च विद्याविभूषित समाजाची भाषा म्हटले जायचे आता आपण संस्कृत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवतो कारण जागतिक स्तरावर संस्कृत भाषेत अनेक प्रयोग होत आहेत. संस्कृत हि टंग ट्वीस्टर आहे. म्हणजे उच्चार शुद्धी, उच्चार स्पष्टता, आणि भाषा शुद्धीसाठी संस्कृत आवश्यक आहे. हायटेक, Computer research टेक्नॉलॉजी मध्ये संस्कृत भाषेचा वापर होतोय. ब्रिटन, जर्मनी, युएसए मध्ये संस्कृत भाषा लहान पणापासून शालेय विषयांमध्ये सहभागी झालीय.

संवादाचे साधन म्हणजे आपली भाषा
मातीचे आपल्याशी नाते म्हणजे भाषा

जिचे बोट पकडून हि सृष्टी बघता येते

ती मायाळू आई म्हणजे आपली भाषा  


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९

ई मेल – manerikarvs@gmail.com 

No comments:

Post a Comment