शिक्षणाची संकल्पना
शिक्षण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. शिक्षण हा चांगले आयुष्य जगण्याचा एक भरभक्कम पाया आहे. शिक्षण ही संकल्पना नक्की कशी आली असेल मनुष्य जातीचा इतिहास पाहीला असता लक्षात येते कि, गरजेतून शिक्षण या संकल्पनेची निर्मिती झाली. माणसाच्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या कृती करणं त्यातून नविन ज्ञानाची भर पडत जाणं आणि मग प्रयोग शोध निर्मिती त्याचे आचरणात रुपांतर होणं. मनुष्याच्या या चिकित्सक वृत्तीचा शोध लागणं आणि आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत याची आत्मानुभुती होणं हे सगळच काही शिक्षण या संकल्पनेच मुळ असु शकतं. पुढे-पुढे माणसाच्या जीवनशैलीचा विकास होऊन मुळ स्वभावात असलेला राग, लोभ, प्रेम, मत्सर, हेवा, असुया या गुणदोषांमुळे हजारो वर्षे सर्व प्रकारचा काथ्याकुट करुन जगाचा विकास, ऱ्हास सर्वकाही मनुष्य जातीला बघायला, अनुभवायला मिळाले. परंतु त्यातून एक गोष्ट मात्र अटळ राहीली ती म्हणजे शिक्षण! शिक्षणा शिवाय मनुष्य जातीला मुक्ती नाही किंवा विकास नाही हे मात्रा वारंवार सिध्द् झाले. शिक्षण हे औपाचारीक किंवा अनौपचारीक असतो. प्रत्येक व्यक्ती औपचारीक किंवा अनौपचारीक अशा दोन्ही शिक्षण पध्द्तींच्या अनुभवातून जावून स्वता:ला समृध्द् करण्याचा प्रयत्नात असतो. शिक्षणाचा मूळ उद्देश ज्ञानाचा प्रयोग करुन स्वता:ची गरज भागवता येणं ही एक गोष्ट तरी शिक्षणाच्या संकल्पनेत निश्चित आहे. ‘गरज’ भागवल्यानंतर मग पुढे संस्कार, कलाविष्कार, प्रतीभाविलास ह्या गोष्टी येतात.
शिक्षण हे एक माध्यम आहे ज्यातून मनुष्य विकास
घडतो तो जीवन सुव्यवस्थितपणे जगायला आवश्यक असतो. आता आपण औपचारीक
आणि अनौपचारीक
शिक्षण संकल्पना काय आहे ते पाहू.
अनौपचारीक
शिक्षण : नैसर्गिकरित्या ज्ञानात पाडणारी भर म्हणजे अनौपचारीक शिक्षण. मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या या जगतातील संवेदना जागृकत होतात. त्यात पंचेंद्रियांच्या मार्फत स्पर्श, श्वास, दॄष्टी, श्रृती आणि वाचा या नैसर्गिक इंद्रियांतुन ज्ञान व्हायला सुरुवात होते. आई आपला पहीला गुरुजी आपले हे इंद्रिय सुसंस्कारीत आणि विकसित
करण्याचे सर्व प्रयत्न करते आणि आपल्या
मुलभूत, भौतीक आणि
मानसिक गरजा भागविण्यासाठी आपण निरीक्षण, गनण आणि कृतीच्या माध्यमातून भाषा शिकतो, भावना व्यक्त करायला शिकतो. आवश्यक त्या कृती शिकतो. आयुष्य जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अनौपचारीक शिक्षण पध्द्तीतुन मिळतो. परंतु मनुष्य स्वभावाच्या ऐतिहासिक गुणधर्माचा विचार केल्यास असे लक्षात येते की केवळ आयुष्य जगणे ही आपली गरज नव्हे तर आयुष्य समृध्द् करणे ही आपली गरज आहे आणि त्यानुसार मग औपचारीक
शिक्षण पध्द्तीची निकड भासते.
जगात सर्वात जुना
इतिहास असलेल्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो त्यानुसार आदर्श औपचारीक शिक्षण पध्द्ती ही भारतातच सुरु झाली असावी असा अंदाज बांधता येतो. हजारो वर्षांपुर्वीच्या प्राचीन परंपरेनुसार
भारतीय शिक्षण पध्द्तीत गुरुकुल पध्द्तीचे निराळे दाखले आपाल्याकडे नेहमीच देतात. त्यामध्ये राजकारण, समाजकारण, युध्द्कला, इतिहास, आचार-विचार या
विषयांचे परिपूर्ण ज्ञान दिले जात असे. प्राचीन भारतामध्ये विश्वविद्यालय असावेत. आपल्याकडे अठरा पगड जाती असोत अथवा बाराबलुतेदार पध्द्ती यावरुन एक गोष्ट लक्षात येते की समाजात प्रत्येकाला कुठल्यातरी गोष्टीत निपून व्हावे लागत
असे आणि तोच त्याचा व्यवसाय असे आणि त्यावरुन त्याच्या जबाबदाऱ्या ठरविल्या जात मग शेतकरी असो, कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, लोहार, सुतार प्रत्येक जण आपली कामगीरी चोख बजावून सगळे जण एकसंघ होवून समाजकारणाचा आणि सामुहीक पध्द्तीने आपल्या
व्यवसायाचे शिक्षण घेत असे. मुळातच मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि
एकमेकांवर अवलंबून आयुष्य जगण्याची त्याला आधीपासूनची सवय आहे. समान परीवर्तन होत असताना काळाच्या ओघात आणि बदलत्या गरजांनुसार आधुनिकतेच्या लोभापायी त्या-त्या काळातील दोष स्पष्ट होत जातात आणि त्यात बदल घडवून आणणे आवश्यक होत जाते. तसे भारतीय शिक्षण पध्द्तीतही होत गेले. परंतू मला एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून दिले जाणारे व्यवसायिक शिक्षण. गुरुकुल पध्द्तीचा
विचार केला तरी पाठांतराबरोबर प्रत्यक्ष कृतीतून शिकविले जाणारे शिक्षण आणि तसा आखलेला दिनक्रम. यामध्ये मुलभूत
गरजा भागविण्यासाठी असलेले वळण संवेदनशील आयुष्य, जगण्यासाठी आवश्यक असे संस्कार मंथन आणि
विकासाचा दृष्टीकोण देणारे नितीप्रयुक्त शिक्षण, त्याच बरोबर संरक्षण शिकविणाऱ्या प्रत्यक्ष तालीम असे सर्वसमावेशक, व्यक्तीला परिपूर्ण
बनविणारे औपचारीक आणि अनौपचारीक संदर्भांचा सुयोग्य संगम असलेली शिक्षण पध्द्ती आपली स्वत:ची होती.
रामायण,
महाभारत, चाणक्यनिती, बोधीस्तव या आणि अशा प्रकारच्या ग्रंथांमधुन आपल्या शिक्षण संकल्पनेची झलक आपल्याला निश्चितच कळतो. जसजसे परकीय आक्रमणे झाली, ब्रिटीशांचे वर्चस्व वाढले. तस-तसे शिक्षणाच्या पध्द्ती बदलल्या. तसे पाहता इतिहासाच्या प्रत्येक पर्वामध्ये ज्या समाजाचे वर्चस्व राहीले
आहे त्या समाजाच्या गरजेनुसार शिक्षण पध्द्ती बदलल्या आहेत. परंतु एक मात्र निश्चित खरा समजदार मनुष्य हा त्याच्या शिक्षणातूनच ओळखला जातो. शिक्षण ह्या शब्दातच शिक्षणाची व्याख्या दडलेली किंवा शिक्षणाचे तत्व दडलेले आहे हे जो समजून घेईल ते म्हणजे शिक्षण.
शिक्षण म्हणजे क्षणा क्षणाला शिकणे...
- सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment