Friday, March 20, 2020


ग्लोबल व्हिजन मध्ये मुलांचे अभ्यासात एकचित्त ध्यान म्हणजेच मन लागण्यासाठी काही वेगळे प्रयोग केले जातात त्याविषयी थोडंसं...

-   मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणसंत रामदासांनी मनाच्या श्लोकांमधून आयुष्य यशस्वी करण्याची गुरुकिल्ली दिली आहे.
मन वढाय वढाय या कवितेत मनाच्या चंचलतेची अनेक उदाहरण बहिणाबाई देतात, त्यात मला आठवतंयमन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं आभायात, म्हणजे मनांची चंचलता माणसाला एकाग्रचित्त होवू देत नाही. MIND IS MONKEY. त्यामुळे मुलांचे CONCENTRATION वाढविण्यासाठी आपल्याला मनन, चिंतन, श्रवण अशा काही गोष्टी घ्याव्या लागतातसंगीतामध्ये ओंकार साधना असते, त्यामध्ये प्राणायम असतेखेळा मध्ये शिरिर सौष्ठव असते, चित्रकले मध्ये एक काल्पनिक विषयात जाण्याची तल्लीनता असते तर श्रवणीय गोष्टी ऐकण्यात एक रमणीयता असतेअशा सगळ्यांचा एकत्रित होणारा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना चित्त एकाग्र  करण्याची सवय लागते. मनाला त्यात एका गोष्टीवर लक्ष खिळवून ठेवण्याची किंवा लक्ष वेधून घेण्याची सवय लागते मग तीच सवय अभ्यासाचे विषय शिकताना कामी येते. भाषागणित, शास्त्र असोमुलांना त्याचे समीकरण ऐकूण घेणे खूप आवश्यक असते. तो विषय आकलन होण्यासाठी आपण काही खास प्रयोग केले पाहिजे जसे रोज बारा सूर्यनमस्काराचे श्लोक म्हणून सूर्यनमस्कार घालणेसंगीतातील स्वरालंकारांची आवर्तने म्हणणे. रोज वर्गात पाच मिनटे ध्यान म्हणजे MEDITETATION करणेकधी (लाऊड रीडिंगप्रकट वाचन घेणे तर कधी MIND RIDING (मन वाचनघेणेअगदी पहिली तिसरीची मुले प्रयोगशाळेत जावून वैज्ञानिक प्रयोग करतातब्रेनव्हेव, अॅस्ट्रोक्लब, लिट्रेचर क्लब, स्वरसाधना, सचेतना, संवादकट्टा, अशा काही उपक्रमांद्वारे मुलांचे अभ्यासातील एकाग्रचित्त वाढविण्यास निश्चितच मदत होते.
CONCENTRATION CAN BE CULTIVATED. ONES  CAN LEARN TO EXERCISE WILL POWER, DISCIPILINE, ONES BODY AND TRAIN ONES MIND.


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९

ई मेल – manerikarvs@gmail.com



ग्लोबल व्हिजन प्रीस्कूलच्या अनोख्या उपक्रमांविषयी...

-    प्रीस्कूलमध्ये अडीच ते पाच वयोगटाची मुले असतात. शिक्षण हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. अगदी तान्हे बाळही शिकत असतेआवाजाच्या दिशेला मान वळवणे इथपासून रांगणेबसने, चालणे, बोलणे हे सारे मुलं आपले आपणच शिकत असते. आपले कुटुंब, परिवार, भाषा शिकते. जगण्यासाठी आनंदासाठी कौशल्य शिकते त्याच्या धडपडीला संधी देणे आपले कर्तव्य आहे. शिकण्याच्या सहज प्रवृत्तीतुन शिक्षण सुरु असतेयाचाच बालशिक्षणात उपयोग करायचा असतो. ‘खेळ हि मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळत मुले आनंदी असतात आणि एकाग्रचित्त होतात. खेळ या नैसर्गिक प्रवृत्तीतुन मुले स्नायूंवर ताबा मिळवतात. कौशल्य (Skills) शिकतात. problem solving, friendship, cooperation, unity, togetherness अशा concepts शिकतात bhataukli, dolls house, pairing, puzzles अशा खेळांनी मानसिक म्हणजे psychological development होते. Smartness, decision making वाढते आपल्याकडे child activity centre आहे. जिथे मुले kids gym करतात, वाळूत खेळतात, गार्डन एरिया आहे. जिथे मुले बागकाम करतात, रंगकाम करतात, मुलांसाठी खास वर्गातील भिंतीचा भाग black board सारखा बनवलाय, ज्यावर मुले खडूने मनमुराद रेघोट्या मारतात, विविध शेप्स काढतात म्हणजे त्यांच्या बोटांना ग्रीप येते. फाईन मोटार स्कील डेव्हलप होतातखेळामधुनी प्रयोगातुनी मुल खरोखर शिकते हे शिकणे आयुष्य घडवते पुढे चिरंतन टिकते. प्रत्येक मुल वेगळे असते. उंची, रंग, ठेवण केसांचा पोत या प्रत्येक बाबतीत मुले वेगवेगळी असतात. त्याच प्रमाणे स्वभाव, समाज, कौशल्य  बुद्धी या बाबतीतही प्रत्येक मुलाची शिकण्याची गती, आवडीचे क्षेत्र, अवधान क्षेत्र वेगवेगळी असतात. मुलांचे हे वेगळेपण लक्षात घेवून त्याच्या शिकण्याचा विचार करायला हवं. खेळामधुनी मौजे मधुनी ज्ञान मिळवता येते तेच मुलांना खडतर जीवन जगणेही शिकवते.



सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


ग्लोबल किड्स प्रीस्कूलमध्ये छोटे बालचमू कसे घडविले जातात.

-     ग्लोबल किड्स प्रीस्कूल म्हणजे आमच्या शाळेचा पूर्व प्राथमिक विभाग, ज्यात प्ले ग्रुप ते सिनियर केजी चे वर्ग आहेतत्याच बरोबर दोन ते पाच वयोगटासाठी अॅक्टीव्हिटी सेंटर आहे. नोकरी करणाऱ्या महिलांची तारांबळ होवू नये म्हणून डे केयर सेंटर हि आहे.
    दोन ते पाच वयोगटातील मुलांना आई शिवाय राहायचे म्हणजे सर्वप्रथम प्रेमाची गरज असतेमातृ-हृदय असणाऱ्या शिक्षिकाआया असल्यामुळे या छोट्या बालचमुंचे चेहेरे नेहेमी प्रसन्न आणि आनंदी असतातआपली शाळा म्हणजे सुखी व कौटुंबिक शाळा आहे. जिथे गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ आणि लहान लहान उद्योगात मुले मशगुल होतात आणि मग शाळेच्या वातावरणात एकरूप होऊन जातातत्यातूनच आनंदिमय वातावरण निर्माण होतेमग छोटी मुले SHARING, CARING, EXPRESSION, LANGUAGE, PRONUNCIATION, FRENDSHIP, COMMUNICATION कॉन्सेप्टस शिकतात, मुलांमध्ये असलेल्या निर्मिती क्षमतेला वाव देण्यासाठी काही गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग केला जातोवस्तुरूप अशी विविध मुलभूत आकारांची साधने किंवा GIFTS LIKE BOLLS, MECHANO, TRICYCLES, WOODEN TOYS,  FLAPH CARDS इत्यादी हेतुपूर्ण व्यवस्थित आखणी केलेले योजनाबद्ध खेळ आणि कार्यमग्नता म्हणजे त्यांना एखादी खेळणी द्या आणि त्यांचे CONCENTRATION एकाग्रचीत्तेचे निरीक्षण करा.
    अशा पद्धतीने आपल्याकडे अगदी छोट्या मुलांना शाळेची गोडी लावली जाते म्हणजे मग त्यांना रोज शाळेत यावेसे वाटते. त्यांच्या तीन तासाच्या शाळेत अगदी सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटण्याच्या वेळेच्या वंदेमातरम पर्यंत शिस्तबद्ध पण खेळी मेळीच्या वातावरणात अनेक गोष्टी मुले शिकतात. मग त्यात सुरुवात हि विविध भाषांमधील प्रार्थना, संस्कृत श्लोक, बोधकथा, कवायत (व्यायाम) प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, सुविचार, चांगल्या सवयींची उजळणी (GOODHABITS) अशा परिपाठने (अॅसेम्बलीने) होते. जिथे मुलांचा २० मिनिटे उभे राहण्याचा स्टॅमीना बिल्टअप होतो.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com


शिक्षणातील विविध स्तर स्पष्ट करा.

      आयुष्य जर चांगले जगयाचे असेल तर संस्कार आणि शिक्षणाला पर्याय नाहीआपल्याला संवाद साधता आला पाहिजेआपल्यातली क्षमता ओळखून त्याचा विकास करता आला पाहिजे आणि समाजहित याची जाणीव असायला पाहिजे.
     शालेय शिक्षण पूर्व प्राथमिकप्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि मग विद्यापीठ व मुक्त विद्यापीठ अशा विविध पायऱ्या निर्माण झाल्याशिक्षण हे मानवी जीवन सुखी, समृद्ध व प्रगत करण्याचे म्हत्वाचे माध्यम आहेमाणसाकडे बुद्धीस्मरणशक्ती, विचारशक्ती, आणि संवादशक्ती आहे म्हणून विकास आहे. प्राचीन काळापासून भारत हा सुसंस्कृत आणि प्रगत देश मनाला जातोचौदा विद्या आणि चौसष्ट कला आपल्याकडे आहेत. ज्ञानार्जन, चारित्र्य संवर्धनसंस्कृती रक्षणव्यक्तिगत आणि समाज विकास हि शिक्षणाची मुख्य उद्दिष्ट्ये, मानवतावादी, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आधुनिक विकासाचे शिक्षण हि काळाची गरज आहे.
      स्वामी विवेकानंदानी जगाला पटवून दिल होतं जगातील सर्व ज्ञानाचा उगम मानवी मनात आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे आत्मानुभूती आणि आत्मसाक्षात्कार!
     भारतीय अभ्यासक्रमानुसार ह्याची सुरवात हि गर्भसंस्कारापासून होतेजन्मापासून मग प्रेम, लळा, निरीक्षण यातून बालक शिकायला लागतो त्यात पालकांसाठी त्यात पालकांनी अतिशय डोळस पाने वागलं पाहिजे. तीन ते पाच-साडेपाच वयोगटात शिक्षण सुरु होतेआमच्या शाळेत पूर्वप्राथमिक विभाग ज्याला आम्ही ग्लोबल किड्स प्रिस्कूल असे म्हणतो तो स्वतंत्र आहे आणि त्यामध्ये सर्वोत्तम संस्कार रुजावण्यावर भर असतोज्यामध्ये उत्तम भाषा संस्कारपरिसराची ओळख, संवाद ससंस्कारअभिव्यक्ती संस्कार, अक्षर-अंक ओळख हे विवध उपक्रमांच्या माध्यमातून तसेच अभिनयसंगीतगाणे ज्यात बडबडगीते, खेळ हे सगळे नाटिकेच्या माध्यमातून यातून दिले जाते.
             ज्ञान मुलांना देता देता
             संस्कारांची हवीच सोबत
             तेव्हा शिक्षण आपले बनते
             जीवनातील अमुल्य दौलत.

सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर

संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

Thursday, March 19, 2020


भारतीय शिक्षण परंपरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा.                        

आपल्याकडे पूर्वी बारा बलुतेदार पद्धती होत्या यावरून एक गोष्ट लक्षात येते कि समाजात प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीत निपुण व्हवे लागते. शेतकरी, कुंभार, कोळी, गुरव, सुतार प्रत्येक जण आपली कामगिरी चोख बजावून, एकसंघ होऊन समाजकारणाचा आणि सामुहिक पद्धतीने आयुष्य समृद्ध करण्याच्या प्रयत्नात कृतीशील पद्धतीने आपल्या व्यवसायाचे शिक्षण घेत असे. मला एक गोष्ट इथे लक्षात आणून द्याची आहे. ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून दिलेजाणारे व्यवसायिक शिक्षण. जे आपण आपल्या ग्लोबल व्हिजन शाळेत अवलंबित आहोत, मुलभूत  गरजा भागविण्यासाठी असलेले वळण संवेदन शील आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असे संस्कारमंथन आणि विकासाचा दृष्टीकोन देणारे नीती प्रयुक्त शिक्षण त्याचबरोबर स्वसंरक्षण शिकवणारे क्रीडा प्रशिक्षण. सर्व समावेशकव्यक्तीला परिपूर्ण बनवणारे औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे (formal and informal) संदर्भाचा सुयोग्य संगम असलेली शिक्षण पद्धती आपल्या शाळेत आहे.
     रामायण, महाभारत, चाणक्यनीती, बोधित्सव भारतातील शिक्षण संकल्पना स्पष्ट झाली आहेव्यवहारी दुनियेत राहण्यासाठी व्यवहाराचे ज्ञान हवे त्यासाठी शिकण्यात आपले स्वप्न हवेएक उदाहरण देते. आमच्याकडे bussiness entreship शिकवतोत्यात दहा दिवस विद्यार्थी out of text आणि out of box the करतातत्यात विद्यार्थी विविध वस्तू तयार करतातत्यात क्रियेटिव्ह आणि innovative असतात त्या best of waste या संकल्पनेत आलेल्या असतातत्याचे प्रदर्शन मांडतातत्यावर price tag लाऊन विकतातयातून विद्यार्थी काय शिकताव्यवहार ज्ञान व्यवसायउद्योग निर्मिती, मॅन्यूफॅक्चारिंग रॉमटेरियल collection, finishing, selling communication मुलांना चांगल्या प्रकारे दुनियादारी शिकविणे आवश्यक आहे.

व्यवहारी दुनियेत राहण्यासाठी व्यवहाराचे ज्ञान हवे
त्यासाठी शिकण्यात आपले दररोज स्वप्न हवे 


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com



माझी शिक्षणाची संकल्पना


       अनुभवातून शिकणे म्हणजे जीवन जगणे असते
      त्या शिकण्याला फक्त गुणांची चौकट कधीच नसते.

    शालेय शिक्षणापासून आपल्या आयुष्याची शैक्षणिक वाटचाल सुरु होते. शालेय विद्यार्थी म्हणून शिक्षणाच्या वाटेवर पहिले पाउल ठेवतो आणि आपल्या औपचारिक शिक्षणाची सुरवात होते. शिक्षणाची व्याख्या शिक्षण या शब्दातच दडलेली आहेशिक + क्षण म्हणजे शिक्षणक्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण.
     जन्माला आल्यानंतर आपल्या संवेदना जागृत होतात मग खऱ्या शिक्षणाची सुरुवात होतेआपले पंचेद्रिय सजग होतात आणि अवती-भवती घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवतातहे झालं अनौपचारिक शिक्षण मग हळूहळू शिस्तबद्धविविध विषयांचे ज्ञान देणारे समूहामध्ये वावरायला शिकवणारे औपचारिक शिक्षण सुरु होते. शिक्षणाने मनुष्याच्या आयुष्यात, स्वभावात, वागण्यात चांगला बदल झाला पाहिजे. मोहनदास करमचंद गांधीनी बॅरीस्टर हि पदवी घेवून वकिली व्यवसायाची सुरवात केली होती परंतु जीवनात आलेल्या उपेक्षित अनुभवांमुळे जीवनाचा नवा अर्थ लक्षात घेऊन स्वार्थाचा त्याग करून आपले आयुष्य लोकार्पण केले. राजबिंडा राजपुत्र गौतम ने क्लेशकारक दुःखदायी अनुभवातून मानवजातीला मुक्त करण्यासाठी आयुष्याची मुलतत्वे लिहिली. या उदाहरणातून हेच स्पष्ट होते कि शिक्षण म्हणजे माणसाच्या आयुष्यात बदल घडून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यातून प्राप्त व्हावा. शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास घडवला पहिजे. शिक्षणाने भाषा, व्यवहारिक ज्ञान, वागण्याच्या पद्धतीत, परिसराचा इतिहास, संस्कृती या सगळ्या गोष्टीचे ज्ञान मिळवून आचरणात बद्दल झाला पहिजेगुणाधारित शिक्षणाकडून गुणवत्ता धरीत शिक्षणाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. मुल भारतीय शैक्षणिक पद्धती हि आदर्श आहे. ज्या मध्ये क्षमता विकासावर भर होता. तीच शिक्षण पद्धती आपण ग्लोबल व्हिजन शाळेमध्ये रुजवत आहोत.

शिक्षण जेव्हा वृत्तीमध्ये मुरते तेव्हा आनंदाने जीवन फुलते अन दरवळते ज्ञानाच्या गंधाने..


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com
आनंदायी शिक्षणाची आवश्यकता का आहे?


सध्याचे युग हे धावपळीचे आहे. प्रत्येकाच्या मागे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कामाची ओढाताण आहे. रोजच्या दैनदिन कामातील अडचणीतून मार्ग काढत प्रत्येक जण जगत असतोत्याचा परिणाम हा नकळत पणे आपल्या पाल्यावरही होत असतो. आणि त्यातून आताचे स्पर्धात्मक युग, यामुळे देखील विद्यार्थी प्रचंड तणावाखाली वावरत असताना आपल्याला दिसेल, त्यातून चांगले गुण मिळाले पाहिजे म्हणून काही पालकांचा वाढत चालेला दबाव या सर्व परिस्थिती मुलांचे बालपण हरवून बसल्याचे आपल्या सर्वाना दिसत असेल. या अवस्थेत केवळ यंत्रवत शिक्षण पद्धतीने एक उत्तम आणि चांगला विद्यार्थी घडवल्या जावू शकत नाही. या उलट जेव्हा आपण आनंददायी शिक्षण प्रणालीचा आपण वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकविले तर विद्यार्थी ते लवकर आत्मसात करतात. हसत खेळत शिक्षण हि संकल्पना विद्यार्थी जडण घडणीचा मूळ पाया आहेया आनंददायी शिक्षण प्रणालीने जेव्हा आपण विद्यार्थ्याला शिकवू तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचे नव चैतन्य निर्माण झालेले असतेत्यांच्या मनावर मेंदूवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होते.
   
     सध्याचे युग हे यंत्राचे युग आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही पण यंत्राचा वापर गरजे पुरता असवा असे मला वाटते पण आज काल बरेच विद्यार्थी संगणक, मोबाईल यांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. त्याच बरोबर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांशी  संवाद सध्याला घरात असे कुणीच नाही या एकलकोंडेपणा मुळे सुद्धा विद्यार्थी मानसिक अस्थिर अवस्थेतून जात असतो त्याला स्थिरता जर द्याची असेलत्याचा भावनिक विकास जर करायचा असेल तर आनंददायी शिक्षण प्रणाली शिवाय पर्याय नाहीयामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहील आणि त्याच बरोबर त्याची एकाग्रताहि वाढेल, आणि त्याच बरोबर आभ्यासच ओझं त्याला जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धतीने डिप्रेशन अंडर होणारे विद्यार्थी आत्महत्येच प्रमाण हि कमी होईल.   


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...