ग्लोबल व्हिजन मध्ये मुलांचे अभ्यासात एकचित्त ध्यान
म्हणजेच मन लागण्यासाठी काही वेगळे प्रयोग केले जातात त्याविषयी थोडंसं...
- “मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” संत रामदासांनी मनाच्या
श्लोकांमधून आयुष्य यशस्वी करण्याची गुरुकिल्ली दिली आहे.
मन वढाय वढाय या कवितेत मनाच्या चंचलतेची अनेक
उदाहरण बहिणाबाई देतात, त्यात मला आठवतंय, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू
मात? आता
व्हतं भुईवर गेलं आभायात, म्हणजे मनांची चंचलता माणसाला एकाग्रचित्त होवू देत
नाही. MIND IS MONKEY. त्यामुळे मुलांचे CONCENTRATION वाढविण्यासाठी आपल्याला
मनन, चिंतन, श्रवण अशा काही गोष्टी घ्याव्या
लागतात. संगीतामध्ये
ओंकार साधना असते, त्यामध्ये प्राणायम असते. खेळा मध्ये शिरिर सौष्ठव असते, चित्रकले मध्ये एक काल्पनिक विषयात
जाण्याची तल्लीनता असते तर श्रवणीय गोष्टी ऐकण्यात एक रमणीयता असते. अशा सगळ्यांचा एकत्रित होणारा
परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना चित्त एकाग्र
करण्याची सवय लागते. मनाला त्यात एका गोष्टीवर लक्ष खिळवून ठेवण्याची
किंवा लक्ष वेधून घेण्याची सवय लागते मग तीच सवय अभ्यासाचे विषय शिकताना कामी येते. भाषा, गणित, शास्त्र असो. मुलांना त्याचे समीकरण ऐकूण घेणे
खूप आवश्यक असते. तो विषय आकलन होण्यासाठी आपण काही खास प्रयोग केले
पाहिजे जसे रोज बारा सूर्यनमस्काराचे श्लोक म्हणून सूर्यनमस्कार घालणे. संगीतातील स्वरालंकारांची आवर्तने
म्हणणे.
रोज वर्गात पाच मिनटे ध्यान म्हणजे MEDITETATION करणे. कधी (लाऊड रीडिंग) प्रकट वाचन घेणे तर कधी MIND RIDING (मन वाचन) घेणे. अगदी पहिली तिसरीची मुले
प्रयोगशाळेत जावून वैज्ञानिक प्रयोग करतात. ब्रेनव्हेव, अॅस्ट्रोक्लब, लिट्रेचर क्लब, स्वरसाधना, सचेतना, संवादकट्टा, अशा काही उपक्रमांद्वारे मुलांचे
अभ्यासातील एकाग्रचित्त वाढविण्यास निश्चितच मदत होते.
CONCENTRATION CAN BE CULTIVATED. ONES CAN LEARN TO EXERCISE WILL POWER,
DISCIPILINE, ONES BODY AND TRAIN ONES MIND.
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment