Thursday, March 19, 2020

आनंदायी शिक्षणाची आवश्यकता का आहे?


सध्याचे युग हे धावपळीचे आहे. प्रत्येकाच्या मागे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कामाची ओढाताण आहे. रोजच्या दैनदिन कामातील अडचणीतून मार्ग काढत प्रत्येक जण जगत असतोत्याचा परिणाम हा नकळत पणे आपल्या पाल्यावरही होत असतो. आणि त्यातून आताचे स्पर्धात्मक युग, यामुळे देखील विद्यार्थी प्रचंड तणावाखाली वावरत असताना आपल्याला दिसेल, त्यातून चांगले गुण मिळाले पाहिजे म्हणून काही पालकांचा वाढत चालेला दबाव या सर्व परिस्थिती मुलांचे बालपण हरवून बसल्याचे आपल्या सर्वाना दिसत असेल. या अवस्थेत केवळ यंत्रवत शिक्षण पद्धतीने एक उत्तम आणि चांगला विद्यार्थी घडवल्या जावू शकत नाही. या उलट जेव्हा आपण आनंददायी शिक्षण प्रणालीचा आपण वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकविले तर विद्यार्थी ते लवकर आत्मसात करतात. हसत खेळत शिक्षण हि संकल्पना विद्यार्थी जडण घडणीचा मूळ पाया आहेया आनंददायी शिक्षण प्रणालीने जेव्हा आपण विद्यार्थ्याला शिकवू तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचे नव चैतन्य निर्माण झालेले असतेत्यांच्या मनावर मेंदूवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होते.
   
     सध्याचे युग हे यंत्राचे युग आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही पण यंत्राचा वापर गरजे पुरता असवा असे मला वाटते पण आज काल बरेच विद्यार्थी संगणक, मोबाईल यांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. त्याच बरोबर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांशी  संवाद सध्याला घरात असे कुणीच नाही या एकलकोंडेपणा मुळे सुद्धा विद्यार्थी मानसिक अस्थिर अवस्थेतून जात असतो त्याला स्थिरता जर द्याची असेलत्याचा भावनिक विकास जर करायचा असेल तर आनंददायी शिक्षण प्रणाली शिवाय पर्याय नाहीयामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहील आणि त्याच बरोबर त्याची एकाग्रताहि वाढेल, आणि त्याच बरोबर आभ्यासच ओझं त्याला जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धतीने डिप्रेशन अंडर होणारे विद्यार्थी आत्महत्येच प्रमाण हि कमी होईल.   


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...