Thursday, March 19, 2020


माझी शिक्षणाची संकल्पना


       अनुभवातून शिकणे म्हणजे जीवन जगणे असते
      त्या शिकण्याला फक्त गुणांची चौकट कधीच नसते.

    शालेय शिक्षणापासून आपल्या आयुष्याची शैक्षणिक वाटचाल सुरु होते. शालेय विद्यार्थी म्हणून शिक्षणाच्या वाटेवर पहिले पाउल ठेवतो आणि आपल्या औपचारिक शिक्षणाची सुरवात होते. शिक्षणाची व्याख्या शिक्षण या शब्दातच दडलेली आहेशिक + क्षण म्हणजे शिक्षणक्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण.
     जन्माला आल्यानंतर आपल्या संवेदना जागृत होतात मग खऱ्या शिक्षणाची सुरुवात होतेआपले पंचेद्रिय सजग होतात आणि अवती-भवती घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवतातहे झालं अनौपचारिक शिक्षण मग हळूहळू शिस्तबद्धविविध विषयांचे ज्ञान देणारे समूहामध्ये वावरायला शिकवणारे औपचारिक शिक्षण सुरु होते. शिक्षणाने मनुष्याच्या आयुष्यात, स्वभावात, वागण्यात चांगला बदल झाला पाहिजे. मोहनदास करमचंद गांधीनी बॅरीस्टर हि पदवी घेवून वकिली व्यवसायाची सुरवात केली होती परंतु जीवनात आलेल्या उपेक्षित अनुभवांमुळे जीवनाचा नवा अर्थ लक्षात घेऊन स्वार्थाचा त्याग करून आपले आयुष्य लोकार्पण केले. राजबिंडा राजपुत्र गौतम ने क्लेशकारक दुःखदायी अनुभवातून मानवजातीला मुक्त करण्यासाठी आयुष्याची मुलतत्वे लिहिली. या उदाहरणातून हेच स्पष्ट होते कि शिक्षण म्हणजे माणसाच्या आयुष्यात बदल घडून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यातून प्राप्त व्हावा. शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास घडवला पहिजे. शिक्षणाने भाषा, व्यवहारिक ज्ञान, वागण्याच्या पद्धतीत, परिसराचा इतिहास, संस्कृती या सगळ्या गोष्टीचे ज्ञान मिळवून आचरणात बद्दल झाला पहिजेगुणाधारित शिक्षणाकडून गुणवत्ता धरीत शिक्षणाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. मुल भारतीय शैक्षणिक पद्धती हि आदर्श आहे. ज्या मध्ये क्षमता विकासावर भर होता. तीच शिक्षण पद्धती आपण ग्लोबल व्हिजन शाळेमध्ये रुजवत आहोत.

शिक्षण जेव्हा वृत्तीमध्ये मुरते तेव्हा आनंदाने जीवन फुलते अन दरवळते ज्ञानाच्या गंधाने..


सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल – manerikarvs@gmail.com

No comments:

Post a Comment

ग्लोबल व्हिजन शाळेत को – करिक्युलर म्हणजे खेळ, संगीत, चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य, हेही विषय शिकविले जातात तर त्यांचे काही वेगवेगळेपण आह...